Ad will apear here
Next
‘दीर्घ काळातील मोठ्या लाभासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर’
परमिंदर धिल्लन यांच्या ‘म्युच्युअल फंड’ विषयावरील चर्चासत्राला प्रतिसाद


पुणे : ‘
भविष्यात सोन्यातील गुंतवणुकीवर आजच्याइतके फायदे मिळणे शक्य नाही; मात्र शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील फायदा वाढवणे शक्य आहे. जोखीम घेऊनदेखील फायदेशीर गुंतवणूक करणे म्युच्युअल फंडाद्वारे शक्य आहे. ३० वर्षांत आपण केलेल्या गुंतवणुकीच्या चार ते ४० पट वाढ होण्याची क्षमता म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत असते,’ असे प्रतिपादन म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञ परमिंदर धिल्लन यांनी केले.

‘म्युच्युअल फंड आणि संपत्ती निर्मिती’ या विषयावर पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. सुरेशचंद्र सुरतवाला असोसिएट्स आणि चंद्रकांत डोंगरे असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांसाठी हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. २० डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत अश्वमेध हॉल (एरंडवणे) येथे हे चर्चासत्र झाले. ‘म्युच्युअल फंड’मधील गुंतवणुकीबद्दलचे समज-गैरसमज यांबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, साहित्यिक भारत सासणे यांच्यासह विविध क्षेत्रातील पुणेकर उपस्थित होते.

परमिंदर धिल्लन म्हणाले, ‘स्वस्त कंपन्यांतील गुंतवणूक फायदा देते असा समज आहे. पण, महाग शेअर्ससुद्धा मोठे फायदे देतात. फंड मॅनेजरला या सर्व गोष्टींचे ज्ञान असावे लागते. शेअर मार्केट सर्वांना समजत नाही; पण म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक समजून घेता येण्यासारखी असते. मंदीकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. ‘एचडीएफसी’सारख्या गृहबांधणी क्षेत्रातील कंपनीत परकीय गुंतवणूक वाढत आहे.’



‘भारतात नकारात्मक घडामोडींची जास्त चर्चा होते. अवतीभवती अधोगतीचे वातावरण आहे असे वाटत राहते. बचत आणि बँकांतील ठेवींचे व्याजदर कमी होत चालले आहे. आपल्याला महागाई कमी करता येणे शक्य नाही. भविष्यात सोन्यातील गुंतवणुकीवर आजच्याइतके फायदे मिळणे शक्य नाही; मात्र शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील फायदा वाढवणे शक्य आहे. इक्विटीमधील गुंतवणूक पब्लिक प्रॉव्हिडंड फंडापेक्षा अधिक लाभ देऊन जाते. फंड निवडताना पोर्टफोलिओतील वैविध्य जपले पाहिजे. एक दिवसापासूनच्या मुदतीची गुंतवणूक फंडात करू शकतो; पण पाच वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजार कोसळला, तरी तो पुन्हा करेक्शनद्वारे उभारी घेत असतो. त्यामुळे घाबरून जाता कामा नये,’ असे धिल्लन म्हणाले.

‘दरमहा किमान १० हजार रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये करण्याची सवय लावून घेतली, तर भविष्यातील वाढीव खर्च, महागाई, घर, शिक्षण, पर्यटन, वैद्यकीय खर्चाची तोंडमिळवणी करणे शक्य आहे. ‘सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’द्वारे गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते,’ असे ते म्हणाले.

‘लाखाहून अधिक गुंतवणूक फंडात करणाऱ्यांना मुदतीचे विड्रॉवल प्लॅनही उपलब्ध असतात. एकूण मुदतीच्या आधी गरजेपोटी काही रक्कम काढत राहिली, तरी प्रत्यक्ष फायद्यातून उरणारी रक्कम नक्कीच घसघशीत असते,’ असे मत त्यांनी मांडले.

‘३० वर्षांत आपण केलेल्या गुंतवणुकीच्या चार ते ४० पट वाढ होण्याची क्षमता म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत असते. गुंतवणुकीस प्रारंभ करायला उशीर झालाय असे कधीही न समजता, सुरुवात करावी,’ असेही धिल्लन यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZIGCH
Similar Posts
गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस लग्नकार्य, मोठी खरेदी अथवा खर्च, यासाठी माणूस मिळकतीमधील थोडे पैसे बाजूला ठेवत असतो. यालाच बचत म्हणतात; पण गुंतवणूक आणि बचत यात फरक आहे. याबाबतच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र’ हे पुस्तक लिहिले आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून आर्थिक उद्दिष्ट
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
तुम्हाला ‘एसआयपी’बद्दल माहिती आहे? शेअर बाजाराची फारशी माहिती नसतानाही तुलनेने कमी जोखीम घेऊन बँकेतील गुंतवणुकीपेक्षा जास्त फायदा मिळवायचा असेल, तर त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या ‘एसआयपी’बद्दल...
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language